नवी दिल्ली – विश्वविजेतेपदावर सहा वेळा मोहोर नोंदविणाऱ्या एम.सी.मेरी कोमने जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने भारतासाठी एक पदक निश्चीत केलं आहे.
मेरी कोमने कोलंबियाच्या इंगोट वालेंसियाला ५-० ने मात केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमच्या नावावर सहा सुवर्णपदकं आणि एक रौप्यपदक जमा आहे. या कामगिरीसह मेरी कोम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू ठरली आहे.
History Scripted!?
India’s @MangteC becomes 1st and only boxer to win 8⃣ medals in #aibaworldboxingchampionships since its inception, aims 7th Gold as she cruise past her ??opponent to reach the Semis. ?
Way to go as ?? assures first medal#GoforGold#PunchMeinHaiDum #boxing pic.twitter.com/VXI883zs96
— Boxing Federation (@BFI_official) October 10, 2019
दरम्यान, आशियाई पदक विजेत्या मेरी बरोबरच संघातील नवोदीत खेळाडु निर, जमुना बोरो हे अनुक्रमे ५७ आणि ५४ वजनी किलो गटात सहभागी होत आहेत. ७५ किलो गटात माजी आशियाई विजोती सवीते बोरा हीच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. तीने २०१४मध्ये झालेल्या याच स्पर्धेत रौप्य पक पटकावले होते. गत स्पर्धेत भारताने चार पदकांची कमाई केली होती, त्यामुळे यंदा या स्पर्धेतील पदकांची संख्या जास्त कशी होइल याकडे प्रशिक्षक मोहम्मद अली कमर यांचे लक्ष राहणार आहे.