मिझोरामची व्हॉलीबॉलपटू बनली खरीखुरी “सुपरवुमन’
गुवाहाटी – एकीकडे एक खेळाडू म्हणुन कारकिर्द आणि दुसरीकडे कौटुंबिक कर्तव्य यांची सांगड केवळ एक स्त्रीच घालु शकते. एक व्हॉलीबॉल सामन्यातील ब्रेकमध्ये आपल्या सात महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत अशीच एक कर्तव्यदक्ष आई सुपरमॉम म्हणून प्रसिद्ध झाली. संपुर्ण देशाने तिच्या या व्हिडीओला सलाम केला आहे. लाल्वेंत लुआंगी असे या सुपरमॉमचे नाव आहे.
या सुपरमॉमचा फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्हॉलीबॉलपटू मॅच ब्रेकदरम्यान आपल्या सात महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असतानाचा हा फोटो पाहिल्यानंतर या सुपरमॉमचे कौतुक होत आहे.
मिझोरामच्या लाल्वेंत लुआंगी या सुपरमॉम व्हॉलीबॉलपटूने सगळ्यांचीच मनं जिंकली. आयजोलमध्ये मिझोराम राज्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ती आपल्या बाळाला घेऊन आली होती. सामन्यातील ब्रेकमध्ये तिने आपल्या बाळाला स्तनपान केले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. तिला सुपरवुमन, सुपरमॉम अशी उपाधी दिली. मिझोरामच्या सेरछिप जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लाल्वेंत लुआंगी हिचा हा फोटो राज्याचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित काही जणांनी शेअर केल्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक खेळाडू आणि आई या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी ही सुपरमॉम सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
Breastfeeding by Mizo volleyball player during match break wins hearts
A Mizo volleyball player has smashed the internet with a candid picture of her breastfeeding her seven-month-old baby during a match break at the inaugural Mizoram State Games in Aiz… https://t.co/FQgNEXBTBn pic.twitter.com/pXhWHgaD4F— Mohankumar (@Mohanku25683347) December 11, 2019
Mizoram volleyball player breastfeeds baby during half-time.
தாய்மை ?❤❤ pic.twitter.com/Z9BHFc4U41
— மாரி MAARI (@GoramarisMaris) December 10, 2019