तेजस्वी सातपुते सातारच्या पोलीस अधीक्षक

सातारा – सातार्‍याचे जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांची नुकतीच पुणे शहरला उपायुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी पुणे शहरच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची बदली झाली आहे.

पंकज देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर पोलीस दलाला शिस्त लावण्याचे मोठे काम केले. त्याप्रमाणेच सातपुते यांनीही पुण्यातील बेशिस्त वाहतूकीला लगाम घालून पुणेकरांच्या सुरक्षेसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी केली.
दोन्हीही अधिकारी लवकरच आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर होणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×