रोगप्रतिकारशक्ती वाढवून आरोग्य आणि फिटनेसचे अधिक फायदे मिळवण्यासाठी एक्झॉटिक खाद्यपदार्थावर खर्च करायला हवा, असा एक गैरसमज आपल्याकडे पसरतोय, पण वर्षानुवर्षे भारतीय घरांमध्ये आणि विशेषत: स्वयंपाकघरात नारळाचं तेल हे सुपरफूड प्राचीन काळापासून एक विश्वासार्ह घटक म्हणून वापरलं जातंय.
नारळाच्या तेलातून अनेकविध लाभ मिळतात. कोणतीही उष्ण पद्धत न वापरता अगदी नैसर्गिकरीत्या खोबऱ्यापासून कोल्ड प्रेस्ड व्हर्जिन कोकोनट ऑईल काढले जाते. तेल काढण्याच्या या पद्धतीमुळे व्हिटॅमिन ई आणि खनिजांसारखे त्यातील सर्व नैसर्गिक लाभदायक घटक कायम राहतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक मीडिअम चेन फॅटी ऍसिडस् हा घटक कोल्ड प्रेस्ड व्हर्जिन कोकोनट ऑईलमध्ये मुबलक प्रमाणात आढळतो.
कोकोनट ऑईलमध्ये लॉरिक ऍसिड, कॅप्रीलिक ऍसिड आणि कॅप्रिक ऍसिड हे एमसीएफ आढळतात.
नारळाच्या तेलात असणारे लॉरिक ऍसिड आणि त्याच्या मोनोग्लीसराईडमुळे त्यातील लिपिड पापुद्य्राचे विभाजन होऊन त्यातून विविध प्रकारचे लिपिड कोटेड बॅक्टेरिया तयार होतात.
यातील मोनोलॉरिन अँटिव्हायरस म्हणून काम करते आणि लिपिड व फॉस्फोलिपिड्सच्या पापुद्य्रात लपलेल्या जीवाणूंचा नायनाट करते. जीवाणूंचे कवच असलेले लिपिड या घटकामुळे नष्ट होते.
मोनोलॉरिनमुळे पेशीतील पापुद्य्राचे सतत स्त्रवणे वाढते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. एचआयव्ही, नागीण, गोवर, व्हेस्क्युलर सोमायटिस अशा विविध जीवाणूंची संख्या मोनोलॉरिनमुळे कमी होते, असेही दिसून आले आहे.
कोल्ड प्रेस व्हर्जिन कोकोनट ऑईलमध्ये एमसीटी (मीडिअम चेन ट्रायग्लीसराइड फॅटस्) हा घटक असतो. यामुळे यकृताची स्वच्छता होते. या प्रकारचे फॅट शरीरात फारच सहज शोषले जाते, त्यामुळे हे अत्यंत आरोग्यकारी फॅट समजले जाते. नारळाच्या तेलातील एमसीएफएमुळे मायक्रोबायल ऑर्गनिझम्समधील पापुद्य्रांना हानी पोहोचते आणि ते नष्ट होतात. त्यामुळे जीवाणूंच्या शृंखलेत जाऊन हा घटक त्यांची निर्मिती थांबवतो.
मात्र, कोणत्याही आजारावर नारळाचे तेल हा काही जादूई उपाय नाही. त्यामुळे, आरोग्यदायी फॅटस्, धान्य, पालेभाज्या असा समतोल आहार घेतल्याने रोगप्रतिकारशक्तीला बळकटी मिळते. नारळाचे तेल रोजच्या स्वयंपाकात वापरता येते किंवा दररोज सकाळी एक चमचा प्यायल्यास उत्तम.