पुणे – होळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे ते हजरत निजामुद्दीनदरम्यान जादा सुपरफास्ट विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सुपरफास्ट विशेष गाडी पुणे स्थानकातून 5 आणि 12 मार्च रोजी सकाळी 5.15 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 5.35 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार आहे. तर हजरत निजामुद्दीन येथून विशेष गाडी 3 आणि 10 मार्च रोजी रात्री 9.35 वाजता सुटणार आहे. तर ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री 9.25 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, कोटा, मथुरा आदी ठिकाणी थांबणार आहे.
विशेष गाड्यांच्या कालावधीमध्ये होणार वाढ
पुणे ते जबलपूर मार्गावर उन्हाळी सुट्टीनिमित्त विशेष गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. साप्ताहिक विशेष गाडी 30 जूनपर्यंत दर मंगळवारी पुणे स्थानकातून सकाळी 7.45 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता जबलपूर येथे पोहोचणार आहे. तर 29 जूनपर्यंत जबलपूर स्थानकातून दर सोमवारी सकाळी 7.45 वाजता गाडी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 4.05 वाजता पुणे स्थानकात दाखल होणार आहे. ही गाडी अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी आदी ठिकाणी थांबणार आहे.