अमोल कचरे
आजच्या रविवारी “पिफ’मधील डेलिगेटस्ची चांगलीच तारांबळ उडणार आहे, हे निश्चित. कारण शेड्युलनुसार काही चांगले चित्रपट आज “पिफ’मध्ये दाखवले जाणार आहेत. यामध्ये मराठी स्पर्धा विभागात अजित वाडीकर दिग्दर्शित “व्हाय’ (ध) आणि सुजय डहाके दिग्दर्शित “तुझ्या आयला’ हे दोन चित्रपट एका मागोमाग एक असे सेनापती बापट मार्गावरील पीव्हीआर पॅव्हेलियनमध्ये दाखवले जाणार आहेत. या शिवाय, ज्या वर्ल्ड कॉम्पिटिशनची डेलिगेट्समध्ये जास्त चर्चा असते, त्यातील तब्बल 5 चित्रपट दोन वेगवेगळ्या ठिकाणी दाखवले जाणार आहेत. त्यामुळे एका अर्थाने “पिफ’मधील हा सुपर संडेच आहे, असंच म्हणावं लागेल.
मार्केट…स्पर्धेत एकमेव भारतीय फिल्म
शिलॉंगमधील 100 वर्षे जुन्या मार्केटवर हा चित्रपट आधारित आहे. यात इतर पात्रांसोबत मार्केट हे एक पात्र आहे. या मार्केटमध्ये राहणाऱ्या काही व्यक्तींच्या आयुष्यातील निखळ अशा भावभावनांचे चित्रण करणारी गोष्ट या चित्रपटात सांगितली आहे. दिग्दर्शक प्रदीप कुरबाह यांनी ज्या पद्धतीने चित्रपटाची मांडणी केली आहे, त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला ईवडूह हे मार्केट नक्कीच लक्षात राहते. वर्ल्ड कॉम्पिटिशनमध्ये मार्केट हा भारतीय चित्रपट सर्वच डेलिगेटस्चे लक्ष वेधून घेतोय. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इतर काही महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळवणारा मार्केट हा चित्रपट पिफमध्ये आपली मोहोर उमटवणार का, याचीच सर्वांना उत्सुकता आहे. आज “मार्केट’ या चित्रपटाचे रिपीट स्क्रिनिंग आयनॉक्स (बंड गार्डन रोड) येथे दुपारी 12 वाजता होणार आहे.
“एनफएआय, कोथरूडबाबत प्रेक्षकांच्या सूचना…
कोथरूडमधील “एनफएआय’ हे एक नवीन ठिकाण यंदा “पिफ’मध्ये आहे. “पिफ’च्या सुरुवातीच्या दोन दिवसांत एनफएआय, कोथरूड येथे चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांनी “पिफ’च्या आयोजकांकडे काही सूचना केल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची सूचना म्हणजे, “एनएफआय’ खूप लोकांना माहिती नाहीये. “एनएफआय’च्या लोकेशनबाबत जनजागृती व्हायला हवी आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी सलग चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना घरूनच पदार्थ आणावे लागतील. कारण, तशी कोणतीच सुविधा इथे नाहीये. इथून पुढे चित्रपट महोत्सवासाठी ठिकाण निवडताना या बाबींचा आयोजकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
सकाळी 11 वा.
वर्ल्ड कॉम्पिटिशन
द ह्युमोरिस्ट (रशिया)
एनफएआय, लॉ कॉलेज रोड.दुपारी 2 वा.
द पेंटेड बर्ड (झेक प्रजासत्ताक,युक्रेन )
एनफएआय, लॉ कॉलेज रोडसंध्याकाळी 5.30 वा.
बिनपोल (रशिया )
एनफएआय, लॉ कॉलेज रोडमराठी स्पर्धा विभाग
‘ ध ‘
(दिग्दर्शक : अजित सूर्यकांत वाडीकर )
पीव्हीआर पॅव्हेलियन ऑडि. 4 – दुपारी 12.30 वाजता
पीव्हीआर पॅव्हेलियन ऑडि. 5 – दुपारी 12.45 वाजता
तुझ्या आयला (दिग्दर्शक : सुजय सुनील डहाके )
पीव्हीआर पॅव्हेलियन ऑडि. 4 – दुपारी 4 वाजता
पीव्हीआर पॅव्हेलियन ऑडि. 5 – दुपारी 4.15 वाजतासकाळी 11 वा.
थीम सेक्शन – कुंकू (1937) – एनफएआय, कोथरूड