सुपर शेअर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स

या आठवड्याचा सुपर शेअर आहे श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स. ही कंपनी वित्तीय सेवा पुरविणाऱ्या श्रीराम समूहातील कंपनी आहे. व्यावसायिक वाहतूक वाहनासाठी कर्ज उपलब्ध करून देते. 1979 साली स्थापन झालेली कंपनी ही सुरुवातीस लोकांकडून ठेवी घेणारी NBFC कंपनी होती. आज कंपनी अवजड व हलकी वाहनं, पिकअप, मिनी ट्रक, ट्रॅकटर्स, बांधकामोपयोगी वाहनं जशी की बुलडोझर व छोट्या प्रकारची कर्ज वाटप इ. सेवा पुरविते.

कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन साधारणपणे 32000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अशा या कंपनीनं गुरुवारी, आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचं एकूण उत्पन्न 19.91 टक्क्यांनी वाढून 3739.85 कोटी रुपयांवर गेलं, तर कंपनीचा त्या तिमाहीतील नफा हा 572.9 कोटी रुपये जाहीर झालाय, जी वाढ मागील वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 24.53% आहे. एकूण व्याजाचे उत्पन्न 19.58 टक्क्यांनी वाढून 1840.30 कोटी झालीय जे मागील वर्षी पहिल्या तिमाहीत 1538.95 कोटी रुपये होती. तर असा हा शेअर निकाल जाहीर झाल्यावर एकदम वाढला परंतु जर आपण MCD निकषांवर हा शेअर खरेदी केला असता तर बराच फायदा पदरात पडून घेता आला असता, कारण दैनिक आलेखावर या शेअरनं 17 जुलै रोजी पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर नोंदवलाय व त्याअगोदर 10 जुलैलाच RSI ने देखील 30 मूल्याखाली पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर दर्शवलाय. असा हा शेअर मागील सोमवारी रु.1200 च्या आत उपलब्ध होता व एका आठवड्यात त्याने 1440 रुपयांचा टप्पा गाठला, म्हणजे तब्बल 20% वाढ झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)