नवी दिल्ली – भारतीय फुटबॉल क्षेत्रातील अत्यंत मानाची समजली जात असलेली इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धा (आयएसएल) यंदा गोव्यात रंगणार आहे.
येत्या नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून यंदा गोवा या एकाच राज्यात ही स्पर्धा होणार आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आरोग्यविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन होईल, असेही आयोजकांनी स्पष्ट केले. करोनाच्या धोक्यामुळे खेळाडू व संघातील सदस्यांना सातत्याने प्रवास करणे शक्य होणार नसल्याने एकाच राज्यात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.