राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही “सुपर 30′ टॅक्‍स फ्री

हृतिक रोशनच्या “सुपर 30′ ला बिहार सरकारने टॅक्‍स फ्री केले आहे. त्यापाठोपाठ आता राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारनेही हा सिनेमा करमुक्‍त करण्याचा निर्णय घेतला आहे. “सुपर 30′ ची कथा ज्या आनंद कुमार यांच्यावर आधारलेली आहे, त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि “सुपर 30′ करमुक्‍त करण्याची विनंती केली. त्यानंतर लगेचच याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

हृतिक रोशनने ट्विट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि आदित्यनाथ यांना धन्यवादही दिले आहेत. बिहारमध्ये 16 जुलैपासून तर राजस्थानमध्ये 18 जुलैपासून “सुपर 30′ करमुक्‍त करण्यात आला आहे. गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीच्या प्रवेशासाठीचे गणित शिकवणाऱ्या आनंद कुमार यांच्या या कथेतून कितीतरी गरिब विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकेल, या आशेवर या सिनेमाला टॅक्‍स फ्री करण्यात आले आहे.

आतापर्यंत “सुपर 30′ ला बॉक्‍स ऑफिसवर मिळालेला प्रतिसाद संमिश्र आहे. आठवड्याभरात सिनेमाने 70 कोटी रुपयांचा धंदा केला आहे. अजूनही थिएटरमध्ये “सुपर 30′ बघण्यासाठी गर्दी होते आहे. त्यामुळे उत्पन्नाचे हे आकडे आणखीन वाढण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)