‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा!

पुणे: शिक्षणाचे बाजारीकरण, आयआयटी कोचिंग क्लासेस व त्यांचा मनमानी कारभार तसेच ती परिस्थिती बदलणाऱ्या आनंदकुमारची कथा मांडणारा चित्रपट ‘सुपर ३०’ हा चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा, अशी मागणी अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्निल बेगडे यांनी केली आहे.

कोणताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद कुमार यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाला बिहार सरकारने व राजस्थान सरकारने कर मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त व्हावा जेणे करून जास्तीत जास्त लोक या चित्रपटाचा आनंद घेतील व विशेषतः युवा वर्ग हा चित्रपट पाहून प्रेरित होऊ शकेल. त्यामुळे  चित्रपटास करमुक्त करण्याची मागणी अभाविप ने केली आहे.

सुपर 30 या चित्रपटात रितीक रोशन याची मुख्य भूमिका असून विकास बहल त्याचे दिग्दर्शक आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ३० मुलांना एकत्र आणून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी गणितज्ञ आनंद कुमार यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट आनंद कुमार यांनी गरीब मुलांना शिकवण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आणि मेहनतीची कथा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.