सुपा, राहुरीत पाच लाखांची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
नगर –
लोकसभा निवडणुकीच्या नगर मतदारसंघात मंगळवारी (दि.23) बंदी असताना देखील देशी-विदेशी मद्य विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत 9 जणांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत. पारनेरमधील सुपा आणि राहुरीमधील वांबोरी येथे ही कारवाई केली. 4 लाख 87 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 7 जणांना अटक केल्याची माहिती अधीक्षक पराग नवलकर यांनी दिली.

देशी दारू 64.46 लिटर, विदेशी दारू 76.76 लिटर, बिअर 11.7 लिटर, एक चारचाकी आणि दुचाकी वाहन कारवाईत जप्त केले आहे. नगर लोकसभा मतदार संघातील निवणुकीच्या दिवशी नगर भरारी पथकाने निवडणुकीच्या काळात कोरडा दिवस (ड्राय डे) जाहीर करण्यात आलेले होते. परंतु बंदी असताना देखील देशी-विदेशी मद्य विक्री सुरु असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत 9 जणांविरोधात गुन्हे दाखल केला आहे. या कारवाईत संजय सराफ, ए. बी बनकर, अनिल पाटील, एस. आर. कुसळे, डी.पी. बगाव, एस. डी. परदेशी, बी.टी.घोरतळे, जी. आर. चांदेकर, एस. एस. भोसले, डी. बी. पाटील, बी. बी. हुलगे, यु. पी. बर्डे, आर. एल. कोकरे, के. के. रावते, पी. बी. अहीरराव, आदींनी कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.