मुंबई – आयपीएलमध्ये आज 36 वा सामना खेळला जात आहे. सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने आहेत. आरसीबीने मागील दोन सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्सने सलग चार सामने जिंकले आहेत. बंगळुरू संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून पाच विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, हैदराबादचा संघ सहा सामन्यांत चार विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स आणि बंगळुरू या दोन्ही संघांनी कोणताही बदल केलेला नाही.
Toss Update from the Brabourne Stadium 👇@SunRisers win the toss and opt to bowl first against @RCBTweets 👍#TATAIPL #RCBvSRH pic.twitter.com/QBO1WHqFmv
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
सनरायझर्स हैदराबाद :- अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को यान्सन, उमरान मलिक, टी नटराजन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड