#SRHvRCB Qualifier 2 : सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला

आबुधाबी –आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांदरम्यान होणारी आजची लढत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बेंगळुरू व हैदराबाद यांच्यातील महत्वपूर्ण लढतीस थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

साखळीतील अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर हैदराबादने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला असून या सामन्यातील कामगिरीमुळे त्यांचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. अर्थात विराट कोहलीच्या नेतृत्वखालील बेंगळुरू संघाने जरी नशिबाच्या जोरावर या गटात स्थान मिळवले असले तरीही कागदावर त्यांचाच संघ बलाढ्य दिसत आहे.

या स्पर्धेच्या इतिहासात बेंगळुरूला एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. गेली बारा वर्षे कोहलीच्या संघावर चोकर्स हा शिक्का बसलेला आहे. ही अपयशाची मालिका खंडित करण्याची त्यांना नामी संधी आहे.

दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने स्पर्धेचे एकदा विजेतेपद पटकावण्याची किमया केली होती. यंदाही त्यांना प्ले-ऑफमध्ये स्थान मिळाल्यामुळे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.