#IPL2019 : पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यास हैदराबाद उत्सूक

बाद फेरी पासून चेन्नई केवळ एक पाऊल दूर

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
वेळ – रा. 8.00 वा
स्थळ – राजिव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद

हैदराबाद  – आयपीएलच्या बाराव्या मोसमात गोलंदाजी आणि फलंदजीच्या बाबतीत सर्वात समतोल समजल्या जाणाऱ्या सनरायजर्स हैदराबादच्या संघाला यंदाच्या मोसमात अनुकूल कामगिरी करण्यात अपयश आले असून सातत्याने होणाऱ्या पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यच्या प्रयत्नात असलेल्या हैदराबाद समोर आज यंदाच्या मोसमातील सर्वात बलाढ्य ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे.

यंदाच्या मोसमात पहिल्या काही सामन्यांमध्ये फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीनंतर मागिल तीन सामन्यांमध्ये फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरी मुळे हैदराबादच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यात त्यांनी आपल्या सात सामन्यांमधील केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे केवळ सहा गुण झाले असून आजचा सामना जिंकून स्पर्धेत पुनरागमन करण्यास त्यांचा संघ उत्सूक असून पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यास आजच्या सामन्यातील विजय त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या मोसमात पहिल्या सामन्यापासुनच प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले असून त्याम्नी आपल्या आठ पैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला असून केवळ एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून सध्या त्यांच्या खात्यात 14 गुण जमा झालेले असून आजचा सामना जिंकून बाद फेरीत प्रवेश नक्‍की करण्यासाठी चेन्नईचा संघ प्रयत्नशील असणार आहे.

यावेळी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हैदराबादने कोलकाता विरुद्ध अखेरच्या क्षणी पराभव पत्करला होता. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन सामन्यांमध्ये राजस्थान, बंगळुरू आणि दिल्लीचा पराभव करताना विजयाची हॅटट्रीक करत स्पर्धेत पुनरागमन केले. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना, मुंबई, पंजाब आणि दिल्लीविरुद्धचे सामने एकतर्फी गमवावे लागल्याने त्यांनी पराभवाची हॅटट्रीक देखील नोंदवली आहे. मात्र, आजच्या सामन्यात चेन्नईचा पराभव करुन पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्यास त्यांचा संघ उत्सूक असणार आहे.

तर, चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यापासूनच विजयीलय कायम राखत आगेकूच केली होती. यावेळी त्यांनी बंगळुरू, दिल्ली आणि राजस्थानचा पराभव करत विजयाची हॅटट्रीक नोंदवली. मात्र, पारंपारीक प्रतिस्पर्धी मुंबई विरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पुनरागमन करत पंजाब, कोलकाता, राजस्थानचा पराभव करत विजयीलय प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांचा संघ सर्वात आधी प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याची शक्‍यता निर्माण झाली असून आजच्या सामन्यातील विजय त्यांचे प्ले ऑफ मधील स्थान निश्‍चीत करण्यास पुरेसा ठरेल.

प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

Leave A Reply

Your email address will not be published.