#IPL2019 : पहिल्या विजयासाठी बंगळुरू प्रयत्नशील

संग्रहित छायाचित्र...........

हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान

सनरायजर्स हैदराबाद Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

वेळ – दु. 4.00 वा.
स्थळ -राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद

हैदराबाद – आयपीएलच्या बाराव्या मोसमात आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर फॉर्ममध्ये असलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या संघाचे तगडे आव्हान असून हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान यावेळी बंगळुरूच्या संघासमोर असणार आहे.

विराट कोहली, मोईन अली, ए. बी. डिव्हिलियर्स सारखे तगडे फलंदाज संघात असूनही बंगळुरूच्या संघाला यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात केवळ 70 धावांवर सर्वबाद होण्याची नामुश्‍की ओढावली होती. तर, दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करण्यात त्यांचा संघ अपयशी ठरला त्यामुळे बंगळुरूच्या संघातील फलंदाजांना आपली जबाबदारी ओळखून फलंदाजी करणे गरजेचे असून हैदराबादसारख्या तगड्या संघासमोर त्यांच्या फलंदाजांना जास्तीत जास्त धावा करणे गरजेचे आहे.

त्यातच बंगळुरूच्या संघाकडे यंदाच्या मोसमात युझवेंद्र चहल वगळता इतर कोणता आघाडीचा बळी मिळवून देइल असा गोलंदाज बंगळुरूकडे नसून त्यांना नवदीप सैनी आणि उमेश यादव यांच्यावर अवलंबून राहावे लगत असल्याने त्यांच्या गोलंदाजीमध्ये धार नसल्याचे जानवते आहे.

तर, दुसरीकडे गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अग्रेसर असलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या संघासमोर पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान असणार आहे. कारण पहिल्या दोन्ही सामन्यात हैदराबच्या गोलंदाजांना विरोधी संघांच्या फलंदाजांना 180 धावांच्या आत रोखण्यात अपयश आले होते. यावेळी आपल्या दोन्ही सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली होती. हैदराबादने राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग केवळ 19 षटकांमधे करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)