निवडणूक जिंकताच सनी पाजी गुरदासपूरमधून गायब…

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गुरदासपूरमध्ये सनी देओलचा ‘ढाई किलो का हात’ काँग्रेसवर भारी पडला. सनी देओल व काँग्रेसचे गुरदासपूर  येथील विद्यमान खासदार सुनील जाखर यांच्यामध्ये दुहेरी लढत झाली होती. भाजपाच्या तिकिटावर गुरुदासपूर येथून निवडणूक लढवून सनी देओल लोकसभेत पोहोचले. मात्र निवडणुकीनंतर त्वरित सुट्टी घेऊन एन्जॉय करतानाचा व्हिडीओ सनी देओल यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केल्यामुळे युजर्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

Missing freedom #freedom. This is a year old video.

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on

‘जणू गुरूदासपूरमधील सगळ्या समस्या संपल्या आहेत. कदाचित म्हणून तुम्ही सुट्टीच्या मूडमध्ये आहात,’ असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरनेही सनी देओल यांना लक्ष्य केले. ‘गुरदासपूर भी आ जाओ,’ असे त्याने लिहिले. तर एक युजर्सने लोकप्रतिनिधींना यानिमित्ताने लक्ष्य केले की, ‘चूक सनी पाजींची नसून लोकांनी तर मत मोदींना दिले आहे, पाजी तुम्ही एन्जॉय करा.’

दरम्यान, सनी देओल यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले की,  ‘सध्या मी काजा (हिमाचल प्रदेश)च्या रस्त्यावर आहे. हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. मागच्या वर्षीही मी येथे आलो होतो.
चांगले लोक आणि उत्तम जेवण. मी अर्धा तास इथेच थांबणार. येथे येऊन खूप चांगले वाटले. असा व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे युजर्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.