मुंबई – सनी लियोन आणि तिचा नवरा डेनियल वेबर यांच्या लग्नाला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त डेनियल वेबरने सनीला एक मौल्यवान गिफ्ट दिली आहे.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त डॅनियलने सनीला चक्क एक हिऱ्यांचा हार भेट म्हणून दिला आहे. सनीला ही गिफ्ट खूप आवडली आणि तिने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये हा हार आपल्या फॅन्सना दाखवला आहे.
ही भेट म्हणजे आपल्यासाठी एक स्वप्न सत्यात आल्यासारखे झाले आहे असे तिने सांगितले आणि नवऱ्याला मनापासून धन्यवादही दिले आहेत.
नवऱ्याने आपल्याला दिलेली साथ या हिऱ्यांप्रमाणेच अनमोल आहे, असे तिने म्हटले आहे. सनी लवकरच “शीरो’ या साकोलॉजिकल थ्रिलरमध्ये काम करणार आहे. त्याचा टीजर तिने अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.