मुंबई – देशात करोनाचा संसर्ग सुरू होताच अभिनेत्री सनी लियोनी अमेरिकेला गेली होती. आता सर्व गोष्टी पूर्ववत होत असताना ती भारतात परतली आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रपटसृष्टी ठप्प झाल्याने अनेक दिग्गज कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळाले असून वेबसीरीजमध्ये आपले नशीब आजमावित आहे.
View this post on Instagram
यात आता सनी लियोनीनेही वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. सनी लियोनी ही चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांच्या आगामी “अनामिका’ वेबसीरिजमध्ये काम करणार आहे. या वेबसीरिजचे शूटिंग नुकतेच सुरू करण्यात आले असून ज्यात वर्षाअखेर फर्स्ट शेड्यूल पूर्ण करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
“अनामिका’ ही गन फू ऍक्शन सीरिज असून याचे 10 भाग असणार आहेत. यात सनी लियोनी दमदार ऍक्शन भूमिका साकारताना दिसणार आहे. अशा भूमिकेत ती पहिल्यांदाच दिसणार आहे. या सीरीजचे सर्व शूटिंग मुंबईत होणार आहे.
View this post on Instagram
विक्रम भट्ट म्हणाले, करोनामुळे काही काळ शूटिंग थांबले होते. पण आता पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. आम्ही सनीसमवेत वेबसीरीजचे शूटिंग सुरू केले आहे आणि सनीच्या चाहत्यांना मार्शल आर्ट आणि ऍक्शन करताना पाहून निश्चितच आनंद होईल.
View this post on Instagram
हा एक थरार अनुभव असेल, असे त्यांनी सांगितले. “अनामिका’ ही वेबसीरीज एमएक्स प्लेयरवर रिलीज करण्यात येणार आहे.
View this post on Instagram