बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनी सतत प्रसिद्धिच्या झोतात असती. सनी लियोनीने नुकताच अंधेरीत 4 हजार स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट खरेदी केला आहे. आता ती आपल्या कुटुंबियांसह नवीन घरात शिफ्ट झाली आहे. सनीने आपल्या नवीन घराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोत सनी लियोनीच्या पतीने तिला उचलून घेत गृह प्रवेश केला असल्याचे दिसून येत आहे. दुस-या फोटोत सनी, डेनियलसह त्यांचे तिन्ही मुले निशा, नूह आणि अशेर दिसत आहेत. तसेच तिस-या फोटोत हे सर्वजण पिझ्झा पार्टी करत असल्याचे दिसतात.
हा फोटो शेअर करत सनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारतामध्ये आमच्या जीवनातील एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. माझे नवीन घर आणि येथील जीवन मला खूपच आवडते आणि हे सुंदर घर आमच्या तीन मुलांसह वास्तवात केकवर आयसिंगसारखे आहे. सतनामवाहेगुरु.’
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सनी लियोनी सध्या रियलिटी शो “स्प्लिट्सविला सीजन 13’चे होस्ट करत आहे. तसेच ती विक्रम भट्टच्या “अनामिका’ वेब सीरीजमध्ये झळकणार आहे. याशिवाय सनी लियोनी “कोका कोला’, “रंगीला’ आणि “वीरमादेवी’ चित्रपटातदेखील काम करत आहे.