बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या नव्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या मनःस्थितीबद्दल सांगितले. या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ती पलंगावर बसलेली दिसत आहे. या फोटोत ब्लॅक रिप जीन्ससह राखाडी आणि काळा पट्टे असलेला ब्लाऊजमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करत तिने फोटो कॅप्शन देत लिहिले की, “हाय, हॅशटॅग मूड.’ दरम्यान, यापूर्वी सनीने दीर्घ प्रतीक्षेनंतर सेटवर परत आल्यामुळे तिने आनंद व्यक्त केला होता.
View this post on Instagram
लॉकडाऊन दरम्यान सनी लिओनीने आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवला होता. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर सेटवर परत आल्यामुळे अभिनेत्री आनंदी आहे. सनी अलीकडेच पती आणि मुलांसह लॉस एंजेलिसहून मुंबईला परतली आहे. सध्या ती कोका कोला या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
View this post on Instagram
सध्या सनी लिओनी एका वेबसिरीजची तयारी करत आहे आणि ती स्प्लिट्सविलाच्या 13व्या सीझनसाठी होस्ट म्हणून शूट करणार आहे. सनी म्हणाली, “मी सेटवर येण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा करत होती. माझे एक वेळापत्रक आहे, पण मी तक्रार करत नसून मी कॅमेऱ्यासमोर येण्यास खूपच उत्सुक आहे. कारण इथेच सर्वकाही आहे.