सनी लिओन सध्या आपल्या आगामी “कोकाकोला’ या हॉरर सिनेमातल्या रोलची तयारी करते आहे. या सिनेमासाठी ती उत्तर प्रदेशातील स्थानिक बोली भाषा बोलण्याची प्रॅक्टीस करते आहे. तिला यासाठी खास ट्रेनरचीही मदत घ्यायला लागते आहे. “कोकाकोला’चे शुटिंग पुढच्या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे.
सिनेमाची कथा उत्तर प्रदेशातल्या खेडेगावात घडलेली दिसणार आहे. यासाठीच सनीला स्थानिक भाषा बोलायची आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सनीने आपण कायमच नवीन गोष्टी शिकायला तयार असल्याचे सांगितले होते. एक कलाकार म्हणून सातत्याने नवीन गोष्टी शिकणे हा स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक विकसित करण्याचा एक चांगला एक्सरसाईज आहे. त्याच दृष्टीकोनातून तिने नवीन भाषा शिकायला सुरुवात केली आहे.
ही नवीन बोली भाषा शिकण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यायला लागत आहेत. बऱ्याच हिंदी सिनेमांमधून काम केल्यानंतर सनी आता दक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात करणार आहे. सध्याच्या “कोकाकोला’ या हॉरर कॉमेडीव्यतिरिक्त ती दक्षिणेतील “रंगीला’ आणि “वीरामादेवी’ या सिनेमांमधूनही काम करते आहे. या निमित्ताने दक्षिण भारतीय संस्कृतीचाही अभ्यास करायला मदत होणार आहे, असे ती म्हणते.