सनी लिओनलाही करोना व्हायरसची भीती 

जगात करोना व्हायरसची साथ पसरायला लागली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची तपासणी होते आहे.


यातच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरायला सुरुवात केली आहे. सनी लिओन आणि तिचा नवरा डॅनिएल वेबर हे देखील परदेशातून मुंबई विमानतळावर उतरले.


मात्र, विमानतळाच्या बाहेर पडताना फॅन्सच्या कॅमेऱ्यासमोरही सनीने तोंडावरचा मास्क काढण्यास नकार दिला. या मास्कशिवाय फोटो काढणारच नाही, असे तिने सांगितले. सेल्फी काढायला आलेल्या फॅन्सनाही तिने मास्कबरोबरच सेल्फी काढू दिला, पण मास्क काढला नाही.


“आपण सुरक्षित असलेले चांगले. विशेषतः आपल्या आजुबाजूला जे चालले आहे, ते पाहता, स्वतःची काळजी स्वतःच घेतलेली अधिक चांगले.’ असे सनीने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


सनीचा अखेरचा सिनेमा “अर्जुन पटियाळा’ होता. सध्या ती “वीरामादेवी’ या तमिळ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या वर्षीच तिचा “मोतिचूर चकनाचूर’ येऊन गेला. सामाजिक मूल्यांच्या विरोधात जाणारे रोलच सनीला पहिल्यापासून ऑफर केले गेले आहेत, पण आता तिच्या कुटुंबासाठी आणि तिच्या स्वतःसाठी योग्य असणारे रोलच करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.