फॅशनमध्ये लेदर वापराविरोधात सनी लिओनचे अभियान

सनी लिओनने लेदरच्या वस्तूंच्या विरोधात एक नवीन अभियान सुरू केले आहे. विशेषतः फॅशनच्या वस्तूंमध्ये लेदरच्या वस्तू वापरायला तिचा आक्षेप आहे. फॅशनसाठी एखाद्या प्राण्याची हत्या करून त्याच्या चामड्यापासून आकर्षक वस्तू करणे आपल्याला अजिबात मान्य नाही, असे तिने म्हटले आहे.


या अभियानासाठी प्राणी हक्क संघटना “पेटा”ने सनी लिओनबरोबर करार केला आहे. सनीने यापूर्वीही “पेटा”साठी काम केले आहे. कुत्रे, मांजर, गाय, बैल, घोडा यासारख्या घरगुती पाळीव प्राण्यांबरोबर कसे वर्तन असावे इथपासून अशा प्राण्यांची नसबंदी, शाकाहाराचा अवलंब आणि अशा अनेक कारणांसाठी तिने यापूर्वी “पेटा”बरोबर काम केले आहे.


मात्र आता फॅशनेबल वस्तूंमध्ये लेदरचा वापर टाळण्यासाठी ती जे अभियान सुरू करणार आहे, त्यामुळे प्राण्यांची हत्या होणे टाळले जाणार आहे. तिच्या या नव्या अभियानाची माहिती तिने सोशल मिडीयावर दिली आहे. सनीची बांधिलकी तिने अगदी व्यवस्थितपणे जपली आहे. तिने शेल्टर होममधून एक कुत्राही दत्तक घेतला आहे. तिने मांसाहारही सोडून दिला आहे, असे “पेटा-इंडिया” चे सेलिब्रिटी आणि पब्लिक रिलेशन डायरेक्‍टर सचिन बांगर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.