मुंबई – अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ती ‘अनामिका’ या वेब सीरिजमध्ये दिसली, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
View this post on Instagram
पण आता सनी लिओनीला दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत काम करण्याची संधी मिळाली असून सनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मजेशीर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. सनीने चाहत्यांसाठी फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अनुराग सनीच्या मांडीवर बसलेला आहे.
View this post on Instagram
सनी लिओनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये सनी पायऱ्यांवर बसलेली आहे. तर अनुराग सनीच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. यादरम्यान सनीच्या चेहऱ्यावर हसू आहे. सनीने या फोटोसोबत एक लांबलचक कॅप्शन दिले आहे, ज्यामध्ये तिने अनुराग कश्यपसोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
View this post on Instagram
सनी लिओन ही बॉलिवूड इंडस्ट्रीची बोल्ड अभिनेत्री आहे, सनीने 2012 मध्ये पूजा भट्टच्या जिस्म 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एमएमएस 2’, ‘एक पहेली लीला’ सारख्या चित्रपटात दिसली. सनी लिओनीने अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग देखील केले आहेत, जे खूप गाजले होते.