मुंबई : व्यवसायाने मूलत: पोर्नस्टार असलेली आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावलेली मूळ भारतीय वंशाची कॅनेडियन सनी लिओनी आता एका दिग्गज अभिनेत्याचा रहिवास असलेल्या इमारतीत राहणार आहे. हा एक साधासुधा माणून नसून “महान’ असामी असून “शहेनशहा’ या नावानेही तो ओळखला जातो.
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन अभिनयाप्रमाणेच गुंतवणूकीतही आघाडीवर आहेत. बिग बींनी अलीकडेच पुन्हा एकदा मुंबईत एक मोठे आलिशान घर विकत घेतले आहे, जे आता चर्चेत विषय बनले आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबईत तब्बल 5,184 चौरस फुटांचे नवीन घर 31 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.
अमिताभ बच्चन गेल्या बऱ्याच दिवसांपासून स्वत:साठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत होते. मात्र, आता त्यांचा हा शोध आता संपला आहे. आपली वार्षिक संपत्ती आणि मानधनामुळे अमिताभ बच्चन चर्चेत असतात. या वयातही ते अतिशय उत्साहाने काम करताना दिसतात. आता देखील त्यांच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स असून, ते कामात पूर्णपणे व्यस्त आहेत.
2020च्या डिसेंबर महिन्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी ही संपत्ती विकत घेतली आहे. मात्र, एप्रिल 2018मध्येच त्यांनी ही मालमत्ता नोंदवली होती. त्यावेळी अभिनेत्याने घरासाठी 2 टक्के मुद्रांक शुल्क भरले होते आणि 62 लाख रुपये देखील भरले होते. अमिताभ बच्चन यांच्या या मालमत्तेची प्रति चौरस फूट किंमत सुमारे 60,000 रुपये प्रति चौरस आहे. या मालमत्तेत अमिताभ बच्चन यांना सहा कार पार्किंग मिळाल्या आहेत. त्यांचे नवीन घर 27 आणि 28 व्या मजल्यावर आहे.
लॉकडाऊन दरम्यान, मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची मागणी वाढत असल्याचे दिसते आहे. इतकेच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अमिताभ बच्चनच्या या इमारतीत अभिनेत्री सनी लिओनीचेही घर असणार आहे. सनी लिओनीने या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर स्वत:साठी नवीन घर घेतले आहे. जिथे ती आपल्या कुटूंबियांसमवेत राहायला येणार आहे. सनी लिओनीच्या या घराची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे.