अभिनेते सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेता सनी देओल याने अखेर भाजपमध्ये जाहिररित्या प्रवेश केला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत त्याने हा प्रवेश केला. तसेच अर्थमंत्री पियुष गोयल हे देखील उपस्थित होते. यावेळी ‘मोदींनी या देशासाठी बरंच काही केलं असून पुढची पाच वर्ष त्यांनाच सत्ता मिळाली पाहीजे’ असे मत सनी देओल याने व्यक्त केले.

‘माझे वडील अटल बिहारी वाजपेयींपासून भाजपसोबत जोडले गेले आणि मी नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपसोबत जोडलो गेलोय’ असेही सनी देओल म्हणाला. दरम्यान, पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर सनी देओल निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तत्पूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा व सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात सनी-भाजपा संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे होती. यातच सनी देओल यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांना पंजाबमधून भाजपातर्फे लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.