साताऱ्यात उन्हाचा पारा 39 अंशावर

सातारा – साताऱ्यात बुधवारी उन्हाचा पारा तब्बल 39 अंशावर पोहचला. त्यामुळे नागरिक उकाड्याने चांगलेच हैराण झाले. बुधवारी सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने रस्ते देखील चांगलेच तापले होते. परिणामी वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता.

तज्ञांच्या मते मान्सून दाखल होण्यास अद्याप दहा दिवसांचा अवधी बाकी असल्यामुळे तापमानाचा पारा सरासरी 35 अंशाच्या आसपास राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्‍यक आहे. दरम्यान, बुधवारी तापमानाचा पारा चांगलाच वाढल्यामुळे नागरिक घामाघूम होताना दिसून आले. काही नागरिकांनी घरासमोरील तसेच परिसरातील झाडाखाली विश्रांती घेण्याचा पर्याय निवडला. तर लहान मुलांनी परिसरातील विहीर, नाले व स्विमिंग टॅंकमध्ये पोहण्याचा आनंद लूटला. दुसऱ्या बाजूला उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. बाजारपेठ आणि एस.टी.स्टॅंड परिसरात देखील नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)