वाई : एक हजार मीटर उंचीवर असणाऱ्या सोनजाईच्या डोंगरावर मंदिराच्या विश्वस्तांनी पाच एकर सूर्यफुलाचा मळा फुलविला आहे. सूर्यफुलांनी फुललेला या मळ्यामुळे संपूर्ण परिसराने पिवळा शालू परिधान केल्याचे विलोभनीय चित्र दिसत आहे. सूर्यफुलाची शेती सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लाभदायक असून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे. बाजारात सूर्यफुलाला चांगली मागणी आहे.