Sunita Williams: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी विल्मोर बुच यांना अवकाशात अडकून अनेक महिने झाले आहेत. हे दोन्ही अंतराळवीर जूनमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एका आठवड्यासाठी पोहोचले होते, मात्र यानातील तांत्रिक अडचणींमुळे दोघेही पुढील वर्षी फेब्रुवारीमध्येच परत येऊ शकणार आहेत.
दरम्यान, सुनीता विल्यम्स यांची काही छायाचित्रे समोर आली आहेत, ती पाहून शास्त्रज्ञांसह जगभरातील लोक चिंतेत पडले. छायाचित्रे पाहून असे दिसते की सुनीता यांचे वजन खूप कमी झाले आहे. यामागे तज्ज्ञांचा असा युक्तिवाद आहे की अंतराळ प्रवाशांसाठी ही एक सामान्य समस्या आहे.
नासाने सांगितले – अंतराळवीरांची प्रकृती उत्तम
सुनीता विल्यम्स यांच्या छायाचित्रांवर नासाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अलीकडील अहवालांच्या प्रतिसादात, नासा स्पेस ऑपरेशन्स मिशन डायरेक्टरेटचे प्रवक्ते जिमी रसेल यांनी स्पष्ट केले की, “आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील सर्व NASA अंतराळवीरांची नियमित तपासणी करण्य़ात येते. सर्जनद्वारे निरीक्षण केले जाते. अहवालानुसार दोन्ही अंतराळवीरांची प्रकृती चांगली आहे.”