Sunita Williams । नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. दोन्ही अंतराळवीर बुधवारी म्हणजे आज पहाटे ३.२७ वाजता स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून परतले आहेत. निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील त्यांच्यासोबत होते. या चौघांचेही अमेरिकेतील फ्लोरिडाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग झाले आहे. त्याठिकाणावरून नासा आणि स्पेसएक्स टीमने त्यांना बाहेर काढले.
सुनीता आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे ९ महिने राहिले, त्या काळात त्यांनी तिथे काय केले? याची माहिती आता नासकडून देण्यात आली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ५ जून २०२४ रोजी आयएसएसवर पोहोचले. त्यांची भेट फक्त ८ दिवसांची होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांना तिथे नऊ महिने राहावे लागले. मात्र, या मोहिमेदरम्यान, सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिल्या.
सुनीता विल्यम्सने आयएसएसची स्वच्छता केली Sunita Williams ।
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली भूमिका बजावली. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की, या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळजवळ फुटबॉल मैदानाइतके आहे. त्यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग केले.
९०० तासांचे संशोधन, १५० प्रयोग Sunita Williams ।
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने,सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील २८६ दिवसांत ९०० तासांचे संशोधन पूर्ण केले. या काळात त्यांनी सुमारे १५० प्रयोग केले. सुनीता विल्यम्स ही अंतराळात इतका वेळ घालवणारी जगातील पहिली महिला ठरली आहे. नासाने असेही म्हटले आहे की, सुनीता यांनी अंतराळ स्थानकाच्या बाहेर ६२ तास ९ मिनिटे घालवली, म्हणजेच त्यांनी ९ वेळा अंतराळात वॉक केला.
कोणत्या संशोधनावर काम केले?
सुनीता विल्यम्स यांनी आयएसएसवरील अनेक महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पांवर काम केले. या संशोधनांमध्ये गुरुत्वाकर्षण, इंधन पेशी, अणुभट्ट्या, जैव पोषक घटक प्रकल्प, जीवाणूंचा वैज्ञानिक वापर यांचा समावेश आहे. त्यांनी केलेले जैव पोषक घटक संशोधन अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरेल कारण ते अंतराळातील प्रवाशांना ताजे पोषक घटक प्रदान करण्यास मदत करू शकते.