मांजरी – भारतीय जनता पार्टीच्या व्यापार व उद्योग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुनीलशेठ भिमराव उडताले यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र दौंड येथे आमदार राहुलदादा कुल,भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे,अध्यक्ष स्वप्नील शहा ,उपाध्यक्ष विकास जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे युवा कार्यकर्ते राजेंद्र शेवाळे,अलंकार खेडेकर, प्रतीक हाके, अविनाश भंडारी,कार्तिक उडताले , आदेश भंडारी उपस्थित होते. या वेळी बोलताना सुनील उडताले म्हणाले की मला मिळालेल्या या पदाच्या माध्यमातून व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून समाजातील गरजू तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणार आहे,तसेच पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.