कोलोंबो – श्रीलंकेतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुनिल परेरा यांचे करोनाच्या प्रादुर्भावामुळे नुकतेच निधन झाले ते 68 वर्षांचे होते. सुनिल परेरा हे संगीत विश्वातील उल्लेखनीय कामगिरीबरोबरच आपल्या सामाजिक उत्तरदायित्वासाठीही प्रसिद्ध होते. सामाजिक असमानता, भ्रष्टाचार, वंशवाद आणि लोकशाही दडपण्याच्या क-तीविरोधात त्यांनी नेहमीच आपली परखड मते मांडली होती.
अरोरा यांना गेल्या महिन्यात करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना कोलोंबो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना गेल्या आठवड्यात घरी सोडण्यात आले होते. मात्र नंतर त्यांची प्रकृती खालावल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल त्यांचे निधन झाले. करोनाचे निर्बंध लागू असल्याने केवळ कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत परेरा यांचा दफनविधी करण्यात आला.