पुणे –दुचाकी फेरीद्वारे शक्तिप्रदर्शन करत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचाराची सांगता करण्यात आली. भर पावसात काढण्यात आलेल्या या फेरीला मतदारांनी तेवढाच जोरदार प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या रॅलीने मतदारसंघातील वातावरण ढवळून काढले. जुना मोटार स्टॅन्ड-गुडलक हॉटेल-ट्रायलक हॉटेल-महात्मा गांधी रोड-अरोरा टॉवर-महात्मा गांधी बस स्टॅन्ड- फातिमानगर- बी. टी. कवडे रोड-वाडिया कॉलेज चौक- ढोले पाटील चौक- सौरभ हॉल- जुना बाजार-अपोलो थिएटर- नरपतगिरी चौक- मालधक्का चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावरून ही फेरी काढत कासेवाडी येथे समारोप करण्यात आला. कांबळे यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीतील पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवकांनी हजारोंच्या संख्येने या फेरीत सहभाग घेत सुनील कांबळे यांनाच विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
नगरसेविका मनीषा लडकत, अर्चना पाटील, कालिंदा पुंडे, धनराज घोगरे, उमेश गायकवाड, महेश लडकत, विवेक यादव, रशिद शेख, गणेश बिडकर, प्रियांका श्रीगिरी, अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर रूपाली बिडकर, शैलेंद्र बिडकर, हिमाली कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे, पल्लवी जावळे, अजय भोसले, महेंद्र वाघमारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या फेरीत सहभाग घेतला. कांबळे यांना सामाजिक संघटना, धार्मिक संस्था, राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत असून महाराष्ट्र राज्य बी अँड सी कामगार संघ, रिपब्लिकन जनशक्ती आणि श्री गणेश वीरशैव लिंगायत गवळी या संस्थांनी कांबळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र दिले आहे.
कांबळेंना भरघोस मतांनी निवडून द्या – कनगती
सुनील कांबळे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन दक्षिणात्य अभिनेते ब्रह्मानंद कनगती यांनी केले. घोरपडी भागात तेलगू भाषिक मतदारांशी या वेळी कनगती यांनी संवाद साधला. त्यांनी सादर केलेल्या डायलॉग्जलाही मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी दिलीप कांबळे, हिमाली कांबळे, किरण मंत्री, दिलीप गिरमकर, गोपाळ चिंतल, संगीता आठवले, विवेक यादव, महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.