Sunil Grover | प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवर’ द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. सोशल मीडियावर देखील तो सक्रिय असतो. सध्या तो आपल्या सुट्टयांचा आनंद घेत आहे. सुनील ग्रोवर भारताच्या कानाकोपऱ्याच फिरत असताना सामान्य माणसांसोबतचे मजेशीर व्हिडिओही पोस्ट करतो. नुकतेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.
सुनीलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका मजुराच्या बाजूला जाऊन त्याच पोझिशनमध्ये झोपतो. सुनीलने तिथे देवदर्शन करून गंगेत स्नान केलं. यानंतर पुढे जात असताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुराच्या बाजूला जाऊन तो झोपतो. हा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘आणि काय हवं सांगा,’ असे लिहिले आहे. Sunil Grover |
View this post on Instagram
यावरून आता नेटकऱ्यांंना त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘इतकं दाखवण्याची काय गरज आहे? मजूर जमिनीवर झोपले आहेत कारण ते थकले आहेत आणि इथे तुम्ही व्हिडीओ बनवत आहात’, ‘भाई व्हिडिओ बनला आता उठ’, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा सुनील ग्रोवर’ एक भाग आहे, ज्याचा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर येत आहे. Sunil Grover |