Sunetra Pawar: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच अधिवेशनाला आल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील होते. सुनेत्रा पवार राज्यपालांचे अभिभाषण सुरु असताना सभागृहात बसल्या होत्या. यावेळी त्या पहिल्या रांगेत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या शेजारी बसलेल्या पाहायला मिळाले. Sunetra Pawar: Sunetra Pawar: सुनेत्रा पवार विधिमंडळात आल्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार त्यांना भेटण्यासाठी गेले होते. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह सभागृहात प्रवेश केला. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हातात घेतली होती. सुनेत्रा पवार सभागृहात काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. सुनेत्रा पवार पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील. सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवारांकडील क्रीडा, अल्पसंख्याक विकास आणि उत्पादन शुल्क या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला आहे. Sunetra Pawar: