Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधी मंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. Sunetra Pawar उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून जावे लागेल. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्या विधानसभेची निवडणूक लढवतील. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी २०२४ ची लोकसभा बारामतीमधून लढली होती. यात पराभव झाल्यानंतर त्यांना पोटनिवडणुकीत राज्यसभेवर पाठवण्यात आले. Sunetra Pawar पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे रिक्त होणाऱ्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. Parth Pawar : राजयसभेवर पार्थ पवार जाण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक काल दिवसभरात छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांची मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज दुपारी दोन वाजता विधान भवन येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. Sunetra Pawar दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा कोणताही निर्णय हा राष्ट्रवादी पक्षच घेईल. राष्ट्रवादी पक्षाच्या त्या निर्णयांना आमचा पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यासोबत चर्चा केली आहे. पण कोणत्याही मुद्द्यावरचा अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. हेही वाचा : Pune Mayor Election : पुण्याचा नवा महापौर कोण? ३ फेब्रुवारीला ठरणार नाव, तर ९ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा