Sunetra Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरुन पक्षात (Sunetra Pawar NCP) मोठा विसंवाद निर्माण झाला असून, अनेक वरिष्ठ नेते नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. या नाराजीमागे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला (Sunetra Pawar NCP) सादर करण्यात आलेल्या पत्रातील काही त्रुटी आणि पदनियुक्तीतील असमानता हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर ‘प्रदेशाध्यक्ष’ असा उल्लेख (Sunetra Pawar NCP) करण्यात आला नव्हता. मात्र, अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर स्पष्टपणे ‘प्रदेशाध्यक्ष’ असा उल्लेख करण्यात आला होता. या घटनेमुळे सुनील तटकरे नाराज असल्याची चर्चा पक्षात जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनाही डावलण्यात येत असल्याची भावना पक्षातील काही नेत्यांमध्ये पसरली आहे. Sunetra Pawar NCP या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी थेट शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. भेटीदरम्यान प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे तटकरे यांनी सांगितले. भेटीनंतर शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल कौतुक व्यक्त केले. “दोन्ही नेते क्षमता असणारे आहेत. त्यांच्या क्षमतेचा कसा वापर करावा, हे सध्याच्या नेतृत्वावर अवलंबून आहे,” असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, पक्षातील वाढता मतभेद आणि विसंवाद रोखण्यासाठी सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात येणार असल्याचेही समजते. आमदारांमध्ये दबक्या आवाजात चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये सध्या संभ्रमावस्था पसरली आहे. पक्षातील एक गट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे समर्थन करत असून, दुसरा गट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे समर्थन करत आहे. आमदारांमध्ये दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की, पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीला सुनेत्रा पवार यांचे पूर्ण समर्थन असल्यामुळे पक्षात हे सर्व घडत आहे. सुनेत्रा पवार यांना या डॅमेज कंट्रोलमध्ये कितपत यश मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल. याशिवाय, पक्षातील एका बड्या नेत्याने पार्थ पवार यांना समज देण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा पक्षात रंगली आहे. एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेला हा अंतर्गत कलह (Sunetra Pawar NCP) पक्ष नेतृत्वासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनेत्रा पवार किती प्रभावीपणे ही परिस्थिती हाताळतात, याकडे पक्षातील सर्व स्तरांतील कार्यकर्ते आणि नेते लक्ष ठेवून आहेत.