राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या रविवारी मुलाखती 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या पुण्यातील निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात रविवारी (दि. 28) मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुकांनी पक्षाकडे रितसर अर्ज दिला आहे, त्यांच्या मुलाखती होणार आहेत. गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता या मुलाखती होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला अध्यक्षा विद्या चव्हाण, युवा नेते पार्थ पवार हे मुलाखती घेणार आहेत. राष्ट्रवादीकडे शहरातील तीन मतदारसंघातून एकूण 24 जण इच्छुक आहेत. चिंचवडमधून आठ, भोसरीतून सात जण, तर पिंपरी विधानसभेतून सर्वाधिक नऊ जण इच्छुक आहेत. इच्छुकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.