वॉशिंग्टन- अमेरिकेत करोनामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी झाली आहे. एच-1बी व्हिसाच्या आधारे ‘आयटी’ क्षेत्रात बहुसंख्य भारतीय तरुणांनी अमेरिकेत रोजगार मिळवला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी H-1B व्हिसावर 2020 च्या अखेरपर्यंत निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे. दरम्यान, अमेरिकेच्या याच निर्णयावर जगप्रसिद्ध सर्च इंजिन असणाऱ्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Immigration has contributed immensely to America’s economic success, making it a global leader in tech, and also Google the company it is today. Disappointed by today’s proclamation – we’ll continue to stand with immigrants and work to expand opportunity for all.
— Sundar Pichai (@sundarpichai) June 22, 2020
करोना महामारीमुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असून लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकी लोकांना प्राधान्य देत त्यांच्या मदतीसाठी ट्रम्प प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मात्र या निर्णयावर भारतीय-अमेरिकन वंशाचे गुगल आणि अल्फाबेट या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली आहे.
सुंदर पिचाई यांनी ट्विट केले आहे की,”ट्रम्प प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य नाही. यामुळे इमिग्रेशनमुळे अमेरिकेला आर्थिक फायदा झाला आहे यामुळे अमेरिका ग्लोबल टेक लीडर बनला आहे. मी या निर्णयामुळे निराश आहे.’ ते पुढे म्हणाले,’आम्ही विदेशी प्रवासीयांच्या बाजूने उभे आहोत. येत्या काळात त्यांना प्रत्येक ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्याही प्रयत्न करू.’ असे ते म्हणाले आहे.
दरम्यान, व्हिसा स्थगितीच्या निर्णयाचा फटका बहुसंख्य भारतीय तरुणांना बसणार आहे. करोनामुळे अगोदरच मोठ्या प्रमाणावर भारतीय तरुणांचा रोजगार बुडाल्याने त्यांना मायदेशी यावे लागले आहे.