निमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर) येथे दरवर्षी डिसेंबरअखेर अथवा जानेवारीच्या सुरूवातीच्या काळात नीरा नदीमधील पाणीसाठा यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे नदीपात्र तुडुंब भरले आहे. त्यामुळे उन्हाळा सुसह्य होणार आहे. गेली काही वर्षे पावसाच्या घटत्या प्रमाणांमुळे नदीमधील पाणी डिसेंबरअखेर ते जास्तीत जास्त जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या काळात संपुष्टात येत होता.
मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नीरा नदीला मागील काही महिन्यांपूर्वी पूर आला होता. सध्या नीरा नदीवरील निमसाखर पळसमंडळ सोबतच इतर बंधारे ढापे टाकून बंद केले आहेत. त्यामुळे नीरा दुधडी भरून आहे. मुबलक पाण्यामुळे सध्या तरी शेतकरी सुखावला आहे. सध्या नदी पात्र दुधडी भरले आहे. मात्र, काही ठिकाणी मात्र बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होत असल्याने पुढे किती काळ हे पाणी टिकेल, याबाबत मात्र साशंकताच आहे.