आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ ट्विटवर सुमित राघवनाचा जोरदार टोला

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने आज 2019 विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा दोन्ही राज्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजेच 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान तर 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. “निवडणुकीची घोषणा झालीय. लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय. ‘तुमचं सरकार, तुमचं भवितव्य घडवण्याचा अधिकार बजावण्याची वेळ आलीय. हीच ती नवा महाराष्ट्र घडवण्याची वेळ आहे.” असं त्यांनी ट्विटर म्हंटल आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या ‘नवा महाराष्ट्र घडवण्याची वेळ’या ट्विटवर अभिनेता सुमित राघवानं चिमटा काढला आहे. “नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल”. असं त्यानं म्हटलंय. सोबत #येरेमाझ्यामागल्या असा हॅशटॅगही दिला आहे. सुमितच्या या ट्विटला शिवसेना कसं प्रत्युत्तर देते, हे आता पाहावं लागणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.