अमेरिकन ओपन टेनिस : सुमीत नागलची ऐतिहासिक कामगिरी

सात वर्षांनी दुसरी फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू

न्यूयॉर्क – भारताचा उदयोन्मुख टेनिसपटू सुमीत नागल याने अमेरिकन ओपन टेनिस
स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पहिल्या फेरीत विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. सोमदेव देवबर्मन याच्यानंतर सात वर्षांनी ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठणारा नागल पहिलाच भारतीय टेनिसपटू ठरला.

नागलने अमेरिकेच्या ब्रॅडली क्‍लॅनवर 6-1, 6-3, 3-6 व 6-1 असे चार सेटमध्ये पराभूत केले. नागल जागतिक टेनिस क्रमवारीत 124 व्या स्थानावर आहे. या विजयासह गेल्या 7 वर्षात ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात दुसऱ्या फेरीत स्थान मिळविणारा नागल पहिलाच भारतीय ठरला.

नागलने क्‍लॅनविरुद्धच्या सलामीच्या पहिल्या दोन सेटमध्ये 6-1, 6-3 अशी आघाडी घेतली होती, पण तिसऱ्या सेटमध्ये क्‍लॅनने दमदार पुनरागमन केले आणि 3-6 असा सेट जिंकला. चौथ्या सेटमध्ये नागलने पूर्ण वर्चस्व राखत विजय मिळवला. हा सामना 2 तास 12 मिनिटे चालला. आता दुसऱ्या फेरीत त्याचा सामना ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमशी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.