Sukhvinder Singh Sukhu Govt। देशात काल उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. या या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा क्रॉस व्होटिंगवर झाली. ज्याचा थेट फायदा भाजपला झाला. हिमाचल प्रदेशमध्ये पूर्ण बहुमत असूनही काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. आता काँग्रेसला हिमाचल प्रदेशात सरकार वाचवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मतदानाची मागणी Sukhvinder Singh Sukhu Govt।
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि भाजपच्या इतर आमदारांनी हिमाचल विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंग पठानिया यांची भेट घेतली. त्यानंतर मतदानाद्वारे राज्याचा अर्थसंकल्प मंजूर करण्याची मागणी केली – याचा सरळ अर्थ असा की, काँग्रेस अर्थसंकल्प मंजूर करण्यात यशस्वी होत नसेल, तर हे स्पष्ट होणार कि त्यांना विधानसभेत बहुमत नाही. राज्यपालांची भेट घेण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्ष राजभवनात पोहचल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.
काँग्रेसच्या सहा आमदारांचे क्रॉस व्होटिंग Sukhvinder Singh Sukhu Govt।
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांना 34-34 मते मिळाली, त्यानंतर लकी ड्रॉद्वारे हर्ष महाजन यांना विजयी घोषित करण्यात आले. काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली आहे. कारण 68 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे 40 आमदार आहेत. राज्यात भाजपचे 25 आमदार असून तीन आमदार अपक्ष आहेत. अशा प्रकारे अपक्ष आणि भाजपच्या आमदारांची संख्या जोडली तर ती 28 होतो.
हर्ष महाजन यांना 34 मते मिळाली, म्हणजे अपक्षांनी जरी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले, तरीही त्यांना काँग्रेसच्या सहा आमदारांची मते मिळाली. या प्रकाराने राज्यातील आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. सुखविंदर सिंग सुखू यांच्या 14 महिन्यांच्या सरकारविरोधात आता भाजप अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.