पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आदेश
नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या सुखोई विमान अपघातग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वायूदलाचे सुखोई विमान जून 2018 मधे पिंपळगाव बसवंत परिसरात अपघातग्रस्त झाले होते. यामधे काही डाळींब आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दोन वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना कंपनीकडून केवळ 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली आहे.
ही मदत अत्यंत तुटपूंजी आहे, त्यामुळे नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी, असे आदेश भुजबळ यांनी दिले. त्यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.