नवीदिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सुकेश चंद्रशेखरन याने पुन्हा आरोप केले आहेत. सुकेश सध्या मनी लॉंडरिंग प्रकरणी अटकेत आहे. यावेळी सुकेशने एक पत्र लिहीत अरविंद केजरीवाल आणि सतेंद्र जैन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत यामुळे दिल्लीच्या राजकारणाची चर्चा पूर्ण देशभर सुरु झाली आहे. मी महाठग आहे तर मला सरकारी शाळांच्या प्रमोशनसाठी आंतरराष्ट्रीय पीआर व्यवस्था करण्यास का सांगितले असा सवाल सुकेशने पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
काही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांना पेड न्यूजसाठी ८ लाख ५० हजार डॉलर्स आणि १५ % कमिशन देण्यात आल्याचे देखील यावेळी सुकेशने म्हंटले आहे. सुकेशने थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केल्याने दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच सुकेशने यावेळी केजरीवाल यांच्यासह सतेंद्र जैन यांना पॉलिग्राफ चाचणीचे आव्हान दिले आहे.
काय म्हटलंय सुकेश नेमकं आपल्या पत्रात
मी केलेल्या आरोपांचे पुरावे देखील देण्यास तयार आहे.
मला “आजपर्यंत कोणीही केले नाही, असे प्रमोशन व्हायला हवे असं सांगितलं.
आधी संपूर्ण पैसे अमेरिकन खात्यात टाकण्यास सांगितले होते,
पण नंतर सतेंद्र जैन यांनी संपूर्ण पेमेंट रोख देण्यास सांगितले. माझ्याकडून तुम्ही पैसे व्हाईट केले असलयाचे सुकेशने यावेळी सांगितले .
“मी माझ्या स्वत:च्या पॉलीग्राफ चाचणीसाठी तयार आहे.
जर तुम्ही बरोबर असाल तर केजरीवाल आणि सतेंद्र जैन तुम्हाला पॉलीग्राफ चाचणी करण्यात काही अडचण नसावी.