नवी दिल्ली – सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) सरकारची एक लहानशी बचत योजना आहे. ‘बेटी बढाओ, बेटी पढाओ’ या अभियानानुसार ही योजना खासकरून मुलींसाठी सुरू केली आहे.
या योजनेनुसार आईवडील आपल्या मुलीचे शिक्षण किंवा लग्नासाठी होणाऱ्या खार्चासाठी 15 वर्षांपर्यंत पैसे बचत स्वरूपात या योजनेत भरू शकतात.
सध्याच्या एसएसवायच्या नियमांनुसार मुलीच्या जन्माच्या लगेचच एसएसवाय खाते उघडून भरणा सुरू करायला पाहिजे. हे खाते दोन मुलींसाठी उघडता येते. मात्र, जर एकाच कुटुंबात दोन जुळ्या मुली असतील तर तीन मुलींसाठी एसएसवाय खाते उघडता येणार आहे. त्याचबरोबर एकाचवेळी तीन मुली जन्माला आल्या असतील तरीही तिन्ही मुलींसाठी एसएसवाय खाते उघडू शकता.
मार्च 2021 अगोदर भरणा केल्यास 7.6 टक्के व्याज मिळणार आहे. सध्या या योजनेत व्याज 7.6 टक्के आहे. मात्र सरकार दर तिमाहीत व्याजाची फेरचाचणी करणार आहे. म्हणजे 31 मार्च 2021 अगोदर भरणा करणाऱ्यांना पूर्ण अवधीदरम्यान 7.6 टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे.
एका वर्षात कमीत कमी 250 रुपये भरणा करण्याची मुभा सरकारने दिली आहे. तर जास्तीत जास्त भरणा दीड लाख रुपयांपर्यंत आहे. जर यापेक्षा तुम्ही अधिक भरणा केल्यास तुम्हाला अतिरिक्त व्याज मात्र मिळणार नाही. हे पैसे तुम्ही केव्हाही काढू शकतात.