राजगुरूनगरातील सुवर्ण पेढीतर्फे महिला ग्राहकांसाठी सुगरण स्पर्धा
राजगुरूनगर – येथील प्रथमेश ज्वेलर्स सुवर्ण पेढीच्या माध्यमातून महिला ग्राहकांसाठी सुगरण महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रियांका थिगळे यांच्या सुकामेवा सॅंडवीच या पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाल आहे.
राजगुरुनगर बाजारपेठेत असलेल्या प्रथमेश ज्वेलर्सच्या दालनात महिला ग्राहकांसाठी सुगरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तिळाचे विविध प्रकारचे गोड पदार्थ ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत 130 महिला ग्राहकांनी सहभाग घेतला. तर हळदी-कुंकू कार्यक्रमात सुमारे एक हजार महिला ग्राहक सहभागी झाल्या होत्या.
विजेत्या महिलांना प्रथमेश ज्वेलर्स पेढीच्या वतीने अनुक्रमे सोन्याची नथ, एक ग्रॅम ज्वेलरी बांगड्या, चांदीची जोडवी असे बक्षीस देण्यात आले. सुगरण स्पर्धा व हळदी-कुंकू समारंभात सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
अनिता गुजराथी, सुनीता शिंदेकर, अरुणा गुगळीया यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. बक्षीस वितरण श्री प्रथमेश ज्वेलर्सचे संचालिका जयश्री जवळेकर, प्रथमेश जवळेकर, स्नेहल जवळेकर, अनिता गुजराथी, सुनीता शिंदेकर, अरुणा गुगळीया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवराज कपाळे, संदीप सांडभोर, विजय काळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
या स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी सर्व ग्राहक बंधू-भागीनीना सहभागी होता येईल अशा स्वरूपात स्पर्धेचे आयोजन करण्याचा मनोदय प्रथमेश जवळेकर, स्नेहल जवळेकर यांनी व्यक्त केला.
शहरात महिलांची खूप वर्षानंतर सुगरण स्पर्धा झाली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत या स्पर्धा जास्त होत होत्या. कुटुंबात जास्त महिला असल्याने त्या या स्पर्धात सहभागी होत असत. मात्र, अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अशा स्पर्धेमध्ये महिला सहभागी होत नाहीत. तिळापासून उत्तम गोड विविध प्रकारचे महिलांनी बनविले पदार्थ कौतुकास्पद होते.
– अनिता गुजराथी, परीक्षक, सुगरण स्पर्धा