सुजय विखे पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश 

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील हे नगर जिल्ह्याच्या दक्षिण मतदार संघातून इच्छुक आहेत. त्यासाठी ते मतदारसंघ गेल्या तीन वर्षांपासून पिंजून काढत आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. या जागेवर आघाडीकडून आपल्याला संधी मिळावी यासाठी डॉ. विखे पाटील प्रयत्न करत होते. मात्र विखे पाटील यांच्या अपेक्षांना सुरूंग लागला.

दरम्यान, सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील असेही बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.