अहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासूनच सुजय विखे-पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होते. मात्र आज भाजपचे जेष्ठ नेते जी पी नड्डा यांनी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्य कार्यालयातून पक्षातर्फे लोकसभेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करीत असताना त्यांनी पक्षातर्फे अहमदनगरची जागा सुजय विखे-पाटील हे लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सुजय विखे-पाटील यांच्या नावावर आता भाजप हायकमांडकडून देखील शिक्कामोर्तब झाल्याने आता आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार करण्यासाठी सुजय विखे-पाटील तथा त्यांचे कार्यकर्ते सज्ज होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.