पसंती कोणाला सुजय की संग्राम

नगर: नगर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे. या निवडणूकीसाठी 19 उमेदवार रिंगणात असले तरी खऱ्या अर्थाने महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे व आघाडीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात लढत आहे. त्यामुळे मतदार राजा सुजय की संग्राम यापैकी कोणाला पसंती देणार यावर 23 मे रोजी नगर दक्षिणेचा खासदार ठरणार आहे. एकतर्फी वाटणारी निवडणूक आता अधिक चुरशी झाली आहे. मी होणार दक्षिणेचा खासदार असा दावा दोन्ही उमेदवारांनी केला असला तरी आज मात्र मतदारराजा या दोघांपैकी कोणाचा दावा फोल ठरविणार हे महत्वाचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.